कॉलिन टज् - लेख सूची

दोन्ही गोष्टी

सर्व संरचनांपुढचा मूळ प्रश्न असतो जगण्याचा. सर्व सामाजिक संरचनांपुढचा मूळ प्रश्न असतो इतर संरचनांशी जुळते घेण्याचा. आणि एका मर्यादेपर्यंत सर्व संरचना सामाजिकच असतात. आपण जिला नीतिमत्ता म्हणतो, जीनुसार आपण वागणुकीचे नियम ठरवतो, त्या कल्पनाव्यूहात वरील दोन्ही गोष्टी येतात. व्यक्ती म्हणून स्वतःसाठी जगणेही येते, आणि इतर व्यक्तींसाठी करण्याची कर्तव्येही येतात. या इतर व्यक्तींमध्ये आपला समाज, आपली …

पेराल ते उगवेल

[कॉलिन टज् आपल्या सो रॉल वुई रीप, (पेंग्विन, २००३) या पुस्तकात अन्न आणि शेतीबद्दलचे दूरदृष्टीचे विश्लेषण करतो. पुस्तकाचे उपशीर्षक आहे, येत्या दहा हजार वर्षांत जन्मणारे सारे जण छान, पोटभर जेवू शकतील; पण प्रत्यक्षात आपली नजीकची पिढीच कशी धोक्यात येऊ शकेल’ पुस्तकाच्या काही भागाचा हा संक्षेप.] दूरदृष्टीने पाहता . . माणूस हा एक थोराड आणि खादाड …

जाणीव आणि विचार, भाषा आणि भाषण

प्राणी शब्द वापरत नाहीत आणि शब्दांवर आधारलेल्या भाषेखेरीज विचार करता येत नाही, यावरून प्राणी विचार करत नाहीत; असे देकार्तचे (Descartes) मत होते. तो तर्कशुद्ध विचारांसाठी ख्यातनाम होता. विसाव्या शतकाच्या बऱ्याच कालखंडात लोकप्रिय असलेला वर्तनवाद (behaviourism) काही प्रमाणात देकार्तच्या मतावर आधारलेला होता. त्या वादाचा दुसरा आधार म्हणजे प्रत्यक्षार्थवाद (positivism). प्रत्यक्षार्थवादाचा पाया हा की निरीक्षणे व मोजमाप …

. . . . आणि हेही विज्ञान

1979 साली मिसिआ लँडो (Misia Landau) ही येल विद्यापीठाची इतिहास-संशोधक पुरामानवशास्त्राचा इतिहास तपासत होती. आपली (म्हणजे माणसांची) उत्क्रांती गेल्या शतकाभरातल्या वैज्ञानिकांनी कशी समजावून सांगितली, त्याचा हा अभ्यास. वैज्ञानिक ज्या कोरड्या वस्तुनिष्ठतेचा उदोउदो करतात, तिचा या उत्क्रांतीच्या वर्णनांमध्ये मागमूस नव्हता, हे लँडोला जाणवले. त्याऐवजी एखाद्या मिथ्यकथेसारख्या रूपात आपल्या पूर्वजांपासून आपण कसे घडलो याचे वर्णन केलेले लँडोला …